Sunday, 4 August 2024

पुणे

 नद्यांचीही केली नाली, बेकायदा वस्ती उदंड झाली,

धारावीसारखेच बकाल, पुणे माझे|


सर्वत्र वाहतूक सुस्त, नागरिक अती त्रस्त

ढाका, लाहोरहूनही सुमार, पुण्य नगरी|


चौका चौकात "भाई" खूप, पोस्टर लावून करती शहर विद्रूप,

गाव गुंडांचे माहेरघर, पुणे सारस्वतांचे|


उशाला धरणे चार, पण राजकारणी करी टँकर व्यापार

गाढवापेक्षाही लाचार, सुसज्ज पुणे|


रावांच्या शिक्षणदुकानी विद्यार्थी रंक, अमाप पैश्यांचा करून घेती डंख

चालवी शिक्षणाचा बाजार, "ऑक्सफर्ड" पूर्वेचे|


मुलांना खेळायला मैदाने नाही, ज्येष्ठांना चालायला उद्याने नाही

फूटपाथ विना जीवघेणे, पुणे सजगांचे|


रस्तोरस्ती कचऱ्याच्या राशी, शुद्ध हवा मिळेल कशी

प्रत्येक ऋतूत नवा आजार, देई पुणे|


कोयते-कट्टे हातोहाती, नेते-गुंडांची घट्ट नाती

विरला कायद्याचा आधार, बा पुणेकरा|


करदात्यांच्या बाल्कनीशेडला नियमांचा दट्ट्या, मात्र वोटबँकेच्या वाढती झोपडपट्ट्या

वाहते फुकट्यांचा भार, पुणे मुके|


सुविधा, सुरक्षा संपत चालली, संस्कृती संपूनी विकृती वाढली

होतेय चहूबाजूने उणे, पुणे माझे|


शिवराय, बाजीरावांच्या तेजाची धार, ज्ञानोबा, तुकोबा, टिळकांचा  विचार

अंमलात स्वतःच्या आणेल का, पुणे माझे?


---

श्रीपाद

५ जुलै २०२४

Monday, 23 July 2018

युद्ध आमुचे सुरु....


सावधान !! आता तरी जागे व्हा !!


आपली घोर फसवणूक होत आली आहे आणि अजूनही जगात आपल्याला "आयुष्य कस जगावं" ह्याचे डोस पाजणाऱ्यांची बौद्धिक भामट्यांची एक वेगळीच फौज आपल्या आयुष्याच्या मूळ उद्देशावर अतिक्रमण करत आली आहे. लहानपणी पंचतंत्रातील  गोष्टी, नंतर शाळेतील सुविचार, सांसारिक आयुष्यात संत वचने , पालक, नातेवाईक, मित्र हे सगळे आपल्याला आपल्या ह्या भूतलावरील अवताराचा खरा उद्देश आपल्याला कळू न देता दांभिकपणे आपल्याला गाफील ठेवत आले आहेत.


आपला जन्मच समाजाचे काही भले करण्यासाठी झालाय तर समाजात इतर लोक का जन्माला आलेत हा सरळ प्रश्न आमच्या कवटीत येतो ! 🤔

सकाळी डोळे उघडून बघावे तर मोबाईल त्या सुविचारांच्या ओझ्याने वाकलेला असतो
काय ते एक एक मेसेज?
डॉ. कलामांनी तत्वज्ञान विषयात PHd केली होती की वैज्ञानीक संशोधनात हा एक अभ्यासाचा विषय,
विश्वास नांगरे पाटील मोबाईल वर पावसाळी वातावरणात वीज कशी पडते ह्याचे ज्ञान वाटतात
नाना पाटेकरांच्या नावाने तर इतकी ज्ञानगंगा वाहतेय की त्यांना प.पू. ही उपाधी मिळेल अशी शंका येते

कोणी फुलांच्या, कोणी मुलांच्या, कोणी देवाच्या चित्रावर मनाला वाट्टेल ते सुविचार खरडून देतो पाठवून! अरे कुठं फेडाल हे पाप?

कोणी तुम्हाला अडचण सांगितली की दे सल्ला, कोंब सुविचार कानात आणि फाड त्याचा मेंदू हे असले धोरण राबवतात काही जण. काय झालय लोकांना?

बरं ह्यांचे सुविचार अभंग, ओव्या, चारोळ्या, शायरी, गझल, इंग्रजी र्हाइम्स अश्या मिळेल त्या स्रोतातून ओरबाडून आणलेले असतात
ही सुविचारी टोळी फक्त तत्वज्ञान वाटून थांबत नाही तर
आरोग्य, अर्थकारण, राजकारण, क्रीडा, स्वयंपाक, कुटनीती अश्या सगळ्याच क्षेत्रात फोफावली आहे

काय ते ह्याच्यात ते टाकून प्या किंवा खा मग अमुक तमुक आजार कसा बरा होतो
एखाद्या राजकारण्यांचे उदात्तीकरण करण्याचा कारखाना काढणे
देशाचे आर्थिक धोरण ठरविणे असे प्रकांड उद्योग बिनबोभाट चालू आहेत आपल्या भोवती

किती माहिती आपण विनाकारण आपल्या आधीच ताणलेल्या मेंदूत विनाकारण कोंबत असतो, का? कोणासाठी? कशासाठी? कधीपर्यंत?ह्याचा विचार न करता आपण सगळे हे ज्ञान वाटत फिरत असतो

आपल्याला खरी गरज आहे विरंगुळ्याची आणि तो मिळतो खऱ्या खुऱ्या गोष्टींतून
खेळांमधून, गप्पा मारून, सोबत जेवण करून, प्रवास(सुटी म्हणून) करून, घरात स्वछता करून, नवं काही शिकून, व्यायाम करून,  मुलांना खेळवून, ज्येष्ठांना ऐकून

प्रत्येक नव्या गोष्टी सोबत वाहत जाण्यापेक्षा आपल्याला काय आवडत ते करण्यात खरं जगणं आहे, अस मला वाटत. नाहीतर तुम्हाला अस नको वाटायला की मीच ज्ञान द्यायला लागलोय

कळकळ ह्याचीच वाटते की माणसांमधले संवादाचे साधन म्हणून तयार झालेली साधनेच तो संवाद तोडायला लागलीत

आणि न कळत रात्री झोपताना हे जाणवत की शांततेच्या शोधात प्रगती करणाऱ्या माणसाच्या जाणिवांचे त्याच प्रगतिशी 'युद्ध आमुचे सुरू' असे हाल झालेत.
घ्या काळजी!!

आदिमानव आणि डेटा सिक्योरिटी

काल परवा पर्यंत आरामात बसलेल्या झुक्याची झोप उडाली , जो तो त्याला अद्वा तद्वा बोलायला लागला आणि होत्याच नव्हतं झालं बिचाऱ्याच!! वाईट वाटलं हो त्याच्याबद्दल.

त्याच्यामुळेच तर कैक कोटी ज्ञानी भारतीयांचा शोध लागला आपल्याला

मेकॉले ला मागच्या 100 वर्षात जे जमलं नाही ते मागच्या 10 वर्षात झुक्याच्या फेसबुकने करून दाखवलं.('करून दाखवलं' अस बोललं की शिवसैनिकांना निवडणुकीचा कैफ चढतो, पण इथं संदर्भ वेगळा आहे).

ह्या ऑनलाइन ब्रह्मदेवाने भारतात अचानक कोट्यवधी अर्थशास्त्री, समाजवादी, आरोग्यतज्ज्ञ, धर्मपंडित, राजकीय मुत्सद्दी जन्माला घातले जे ऑनलाइन चावडीवर बसून स्वतःची खाप पंचायत, दवाखाने, धार्मिक कार्यक्रम राबवत आहेत आणि अनेक रिकाम्या माठांना ज्ञानाचे पाझर फुटले.
जो तो तावातावाने आपापल्या अगाध ज्ञान सागरात इतरांना बुडवून अर्धमेलं होई पर्यंत डुंबवू लागलाय.

बरं हे ज्ञानसागर ढवळून काढायला लागणाऱ्या इंटरनेट नामक 'वासुकी नाग' अंबानी तात्यांनी लागोलाग आणला
मग काय भयंकर मंथन सुरू!
सकाळीच 'हॉट सीट', दिवसभर ऑफिस सीट, रात्री बेड वर पडून डोळे फुटोस्तर कमेंट्स लिहिणे, पोस्ट फॉरवर्ड करणे, टॅग करणे असे अनेक रत्न सुर-असुरांच्या हाती लागत राहिले

पण एक दिवस अचानक त्यातून 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल निघाले आणि हे सगळे ज्ञानी तळमळायला लागले. त्यांना असं वाटायला लागलं की झुक्याने तयार केलेली ही सृष्टी खोटरडी आहे, पापी आहे
कोणी मग स्वतःची लक्तरे लपवण्यासाठी अश्याच काही पोस्ट्स वर BFF लिहून पापक्षालन करण्याची केविलवाणी धडपड करू लागले
पण काही ताठ कण्याचे ज्ञानी लोक सरळ सरळ झुक्याला दोष देऊ लागले की आमची मौल्यवान खासगी माहिती तू विकली आता तुला माफी नाही
त्यात पुन्हा असुरांचे शिरोमणी पप्पूरासुर ह्यांनी ठिणगी टाकली की इंद्रा('नरे' सायलेंट आहे) हे हलाहल निर्माण करून स्वर्गाच सिंहासन मिळवलंय वैग्रे वैग्रे

शेवटी 'अनलिटीका' युगात झालेल्या ह्या मंथनाचे प्रायश्चित्य म्हणून शेवटी झुक्यानेच 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल स्वतः च प्राशन करून ह्या ऑनलाइन सृष्टीला वाचवले

राहिला प्रश्न फेसबुकज्ञानी लोकांचा, त्यांच्यासाठी......

"हे हुच्च प्रतीच्या ज्ञानी विद्वानांनो तुम्ही का बरे हुंकारता डेटा सिक्योरिटी साठी? तुम्हीच तर स्वतः ओक ओक ओकता सगळं सगळीकडे
तुमचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो, आधारकार्ड च्या प्रति सगळीकडे वाटत फिरता उघड उघड.
बिनकामाच्या लिंक वर जाऊन 99 रुपयात रिबॉक चा बूट मिळवणारे, 'विशेष' फोटोखाली स्वतःच्या नावाचे तीन अक्षर आणि .com लिहिणारे, फेसबुक खात सुरक्षित ठेवण्यासाठी BFF लिहिणारे तुम्ही अजूनही 'ऑनलाइन आदिमानव' आहात "

नको त्या वावटळीच्या मागे पळणारे रिकामटेकडे लोक केवळ इंटरनेट आणि फोन स्वस्त झाले म्हणून वाट्टेल ते थेर करणारे अर्धवट ज्ञानी असे कोट्यवधी भारतीय केवळ लोकशाही आहे म्हणून निव्वळ बेबंद वागत आहेत. जो पर्यंत हे असे लोक सुधारत नाहीत तोपर्यंत 'डेटा सिक्योरिटी' वर विचारमंथन करणाऱ्या पुढारलेल्या जगासमोर हे लोक अजूनही 'आदिमानव'च समजावे लागतील

-----------------------------
©Shreepaddeshpande
14 April 2018

Friday, 20 July 2018

समग्र पोपटपुराण

अध्याय पहिला

एकेकाळी एका आटपाट नगरात सर्व लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आपापले काम करून पोट भरत आणि रात्री निश्चिन्त झोपत आणि पुन्हा आपापल्या कामाला जाणे असा त्यांचा दिनक्रम!

पण जगात सगळं सुरळीत थोडीच चालत? हळू हळू त्या नगरात काही लोकांनी वेगवेगळे व्यवसाय चालू केले.
त्यातच होते दोन भाऊ उधु आणि राजू, त्यांचे वाडवडील ईश्वराकडे गेल्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांनी नवे दुकान उघडले.

उधु झाला फोटोग्राफर आणि राजू झाला पेंटर. आता फोटो स्टुडियो ला जास्त जागा लागते म्हणून मोठा भाऊ असलेल्या उधु ने घरातल्या सगळ्या जागेवर स्वतःचाच व्यवसाय वाढवला
मग, अतिशय रागीट आणि स्वाभिमानी असलेल्या राजू ला हे सलत होत आणि त्याने एकेदिवशी घर सोडलं आणि थेट जाऊन छोट पण नवं घर बांधून आपला पेंटर चा व्यवसाय चालू केला. काही गावकऱ्यांनी देखील त्याच्या ह्या धाडसाचं कौतुक म्हणून त्याला 13 चौरस फुटांचा एक ओटा बांधून दिला आणि नाशिकहून खास तंबू आणून त्याच्या दुकानासमोर लावला. वाह!! आता मात्र राजू पेंटर सगळ्या नगरात प्रसिद्ध झाला होता.
नगरातील ज्येष्ठ असलेल्या वासुदेव काकांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी चिपळ्या वाजवत त्याला कानमंत्र दिला की स्वतःच दुकान काढलंस तर 16 तास मेहनत करून ते चालवणं भाग आहे. (वासुदेव काका नेहमी सकाळी रोज नव्या गल्लीत जाऊन जोरजोरात चिपळ्या वाजवून लोकांना हैराण करायचे, नगरातले सगळे त्यांच्यामुळे त्रस्त आहेत. असो, पण ही गोष्ट त्यांची नाही, त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी.)

तर अश्या प्रकारे उधु-राजू मध्ये भावबंदकी आली आणि त्यांनी एकमेकांवर नको नको ते शब्दपुष्प अर्पण करण्यास सुरुवात केली.

इकडे वासुदेव काकांच्या कुटुंबाचा एक सदस्य असलेल्या सुजित ने त्याचा मित्र पृथ्वीराज च्या साथीने सावकारी आटपाट नगरात सुरू केली, बघता बघता सगळ्या आटपाट नगरात प्रत्येकजण त्यांच्या पाशात अडकला
वेळप्रसंगी त्यांचे गुंड विंचू (स्कॉर्पिओ) घेऊन सगळ्या नगरात दहशत माजवत होते
वासुदेव काका आरामशीर चिपळ्या वाजवत हा सगळं प्रकार उघड्या डोळ्याने बघत असत. उधु-राजू तर एकमेकांना लाखोल्या वाहण्यात मग्न होते. गावात ज्यांना ज्ञानी-सर्वज्ञ समजावे असे लोक नगराची दुरावस्था करायला लागले.

पण, भगवंत हा नेहमीच निर्बलांना वाऱ्यावर सोडत नाही!! एकेदिवशी ऐन दिवाळीच्या दिवसात एक मोठ्ठ वादळ आलं आणि हा हा म्हणता उधु-राजू-सुजित-पृथ्वी-वासुदेवकाका सारख्या सगळ्या पुंडांची वाताहत झाली! जणू नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर हे सगळे असुरासम नर दानव गाडल्या गेले


आणि इंद्राचं राज्य आटपाट नगरात आलं!!


क्रमशः

©श्रीपाद देशपांडे
21 जुलै 2018
FreeToShare

Friday, 24 February 2017

उत्सव की श्रद्धांजली

त्याच कायेsss

"एखादी गोष्ट आपल्या जवळ नसली ना मग त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळायला लागते"

हा माझ्या आयुष्यात अजिबात बदल न घडवणारा पण जर आठेक  दिवस ऐकला नाही तर काही तरी चुकल्या चुकल्या सारखं वाटणारा संवाद दुर्दैवाने काही बाबतीत खरा झालेला. 

अगदी ४ वर्षांचा असल्यापासून माझ्या आजूबाजूच्या आज्जी, आई, काकू, मावशी, आत्या, मामी, बहिणी ते थेट बायको पर्यंत सर्वांनी कधीतरी कोणाबद्दलतरी उघडपणे किंवा माघारी, जवळ-जवळ हरलेल्या शाब्दिक लढाईचे विजयात रूपांतर करताना वापरलेलं एक जबरी अस्त्र म्हणून झालेला त्याचा उपयोग मला जवळून आणि अनेकदा अनुभवता आलाय. त्यामुळे माझ्या कोडगेपणात एक विशेष प्राविण्य आलंय  आणि आताशा त्यातली भेदकता कमी वाटायला लागली.कोणी पुरुष माणूस हे महान वाक्य उच्चारताना मी ऐकलं नाही आणि त्याच कारण शोधणे म्हणजे उगाच मधमाश्याच्या पोळ्यावर मायेने हात फिरवायला जाण्यासारखे असतं.

तत्कारणे बायकोला "हे ना आजकाल जास्त वादात पडत नाहीत आणि शेवटी माझं त्यांना पटत म्हणून जास्त विचारत देखील नाहीत" असं  ती एखाद्या तिच्या मैत्रिणिला किंवा खासकरून माहेरच्या एखाद्या व्यक्तीला सांगताना किती सुख मिळत असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.  
म्हणजेच एखादी गोष्ट हक्काची झाली की  माणूस  तितकीशी फिकीर नाही करत तशीच, ती जर हळू हळू त्याच्या कडून काढून घेतली तर तो तितकासा विव्हळत देखील नाही सगळं कस सोपं असत फक्त हळू हळू सवय लावावी लागते.

लहानपणी जेवायला काही तरी मस्त म्हणून खमंग थालपीठ आणि खीर पाहून तृप्त होणारे आपण पिझ्झ्याचे आणि बर्गरचे लचके तोडून चॉको लाव्हा केक किंवा तत्सम डेझर्ट खाऊन ऍसिडिटी ची ढेकर दिल्याशिवाय एखाद्या प्रसंगाचे सेलिब्रेशन पूर्ण मानत नाही. हे काय एकदम झालं? छ्याsss तब्बल १०-१५ वर्ष लागली आपल्याला मॉडर्न कल्चर शिकायला. "साधतसे सिद्धी करिता सायास" असं 'सेंट' तुकाराम किंवा 'सेंट' रामदास कोणी तरी बोलून गेलेत आणि आपण हळूहळू इतके निपुण झालो की पुण्यातल्या एका आदरणीय काकूंनी (पुण्यात वय वर्ष १५० पेक्षा कमी वयाच्या स्त्रीला 'काकू' म्हणणे गुन्हा असूनही) "आज आपण उपवासाचा पिझ्झा कसा बनवायचा ते शिकू" ह्या शीर्ष वाक्याने त्यांची पाककला दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित केलीये.

कस आहे, म्हणजे आम्ही आमचं मूळ विसरून इतके निराधार होतोय की  कोणत्याही अल्पजीवी फॅशन च्या आहारी जातो, फक्त चकाकणाऱ्या पण मूल्यहीन संकल्पनांना डोक्यावर घेऊन नाचतोय आणि "पुढे काय?" ह्याचा विचार न करताच जग हाकलेल  तसं  हाकलल्या जातोय. हे काय एकदम झालं? छ्या sss  तब्बल ५० -६० वर्ष लागली. इंग्रजी म्हणजे स्टेटस सिम्बॉल , मराठी म्हणजे मागास कंगाल ही  समज मराठी लोकांत रुजली, पोसल्या गेली, वाढीस लागली आणि मजबूत झाली. ती  का झाली त्याच कारण म्हणजे आपल्याला आपल्याच भाषेची लाज वाटणे ह्यातून झाली असा माझ ठाम मत आहे (किंबहुना पुण्यात तुम्हाला प्रत्येक विषयात 'ठाम' मत असल्याशिवाय इथला पासपोर्ट मिळत नाही ! माहितीए ?)

मागील अनेक वर्षात परिस्थितीने सधन किंवा शहरी किंवा बुद्धिवादी प्रगल्भ समाजाने इतर भाषांना अतिशय अवास्तव महत्व तर दिलेच पण मराठी भाषेची गळचेपी स्वतःच केली. ह्याचाच परिणाम म्हणून कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात "कामवाली गंगूबाई"चं फक्त मराठी राहीली  जेंव्हा कि इतिहासात भारतात पहिला चित्रपट मराठी माणसाने बनवला. रजनीकांत हा तामिळ सुपरस्टार म्हणून अभिमानानं राहतो पण सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर मराठी खेळाडू म्हणून राहू शकले नाही. इतकेच काय ९० च्या दशकात आमचा मुलगा इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो असे सांगनारे पालक मराठी मुलांच्या पालकांना एका हीण स्वरात सांगताना मी स्वतः पाहिलंय.

मराठी शाळा मेल्या , मराठी साहित्य मेले, मराठी पदार्थ मेले , मराठी खेळ मेले , मराठी सणवार मेले , मराठी इतिहास मेळा , मराठी आदब मेली, मराठी शुभंकरोती मेली , मराठी तिथी तारखा मेल्या, नऊवारी-नथी-कुंकू-पैंजण-फेटा- धोतर मेले इतकच काय मंगळसूत्र-जोडवे हि 'मागास' झालेत, अंगाई-पाळणे-जोगवे-काकडआरत्या - श्लोक-अभंग-पोवाडे विरलेत, मराठी लोकांचा व्यापार गेला , जमिनी गेल्या , शिक्षण संस्थागेल्या, नोकऱ्या गेल्या, धमक-चमक-गमक- कुमक सगळंच संपलय  एकदम नाही . . . . . . . .  हळू हळूच आणि  नसेल संपलं  तर संपेल !

मान्य की मराठी शाळांच्या इमारती चांगल्या राहिल्या नाहीत म्हणून मुलांना 'चांगली' शाळा मिळत नाही  पण घरी तरी मराठी बोला. जो पर्यंत आपण मराठीला ज्ञानभाषा म्हणून त्यात योगदान देत नाही तो पर्यंत हे असच चालू राहणार.

प्रयत्न करून बघा , Hi चा नमस्कार करून, गेट टुगेदर ची अंगत पंगत करून, केक कापण्या सोबत औक्षण करून , डायनिंग टेबल च्या घरात देव पूजेच्या पाटाला जागा देऊन. ट्विंकल ट्विंकल सोबत मामाच्या गावाला गाऊन, गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष म्हणून, कॉर्नफ्लेक्स चे दुधपोहे करून आणि मुळात हे सगळं मागास किंवा 'डाउन मार्केट ' न समजता आपलं , स्वतःच, हक्काच, आपुलकीच , मनातलं , समाधानाचं वैभव म्हणून. जगात जिंकायला स्वत्व सोडायची गरज नसते मुळी . दुसऱ्या भाषा-संस्कृती शिका ना कोण नको म्हणतय पण आपल ते अभिमानाने सांगायची लाज कशाला? गर्जु  द्या कि मराठी चा जयजयकार !!

अजूनही "मराठी विज्ञान परिषद,मुंबई" किंवा "मराठी साहित्य परिषद, पुणे" किंवा सिंधुताई सपकाळ किंवा बाबा आमटे आणि पुढल्या पिढ्या ह्या, जागतिक कीर्तीचे डॉ. नारळीकर, डॉ. माशेलकर मराठीत त्यांचं ज्ञान आपल्यासाठी मराठीत लिहू शकतात,काही मायभूमी पासून दुरावलेले स्वतःच्या पैश्यातून विदेशात 'मराठी मंडळाचा' डोलारा सांभाळतात  आणि आपल्याला ज्ञात-अज्ञात अश्या अनेक व्यक्ती किंवा संस्था मराठी च्या मशालीला  नेमाने तेल-पाणी  करताहेत. त्यांची शक्ती कितपत टिकेल ह्या जागतिकीकरणाच्या तुफानात ते माहीत नाही. पण आपल्यासारखे  सामान्य दगड मात्र छोट्या छोट्या सवयीतून त्या मशाली भोवती एक मजबूत बुरुज बांधू शकतो आणि कधी काळी वैभवशाली असलेली माय मराठी जगवू  शकु , टिकवू शकु आणि टिकलोच तर वाढवू देखील. मराठी माणूस खेकडा असतो हि ओळख पुसून मुंगीची ओळख मिळवू !

२७ फेब्रुवारीला जागतिक मराठी राजभाषा दिन आहे ! त्याला "दीन" न बनावता अभिमानाने डोक्यावर घ्या आणि त्याला उत्सव म्हणायचं का  श्रद्धांजली असा प्रश्न आपल्या भावी पिढीला पडता कामा  नये !

कारण
. .
. .
. .
. .
त्याच कायेsss

"एखादी गोष्ट आपल्या जवळ नसली ना मग त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळायला लागते"

Wednesday, 8 February 2017

कुठे शोधीशी.......

"माझ्याच नशिबी असं  का ? खरंच देव आहे का ह्या जगात? "

हे आपल्या सगळ्यांचं आवडत वाक्य जे कि नेहमी आपल्या नावडत्या वेळेस आपण वापरतो. सगळे प्रयत्न करून थकून जातो आपण, धीर सोडतो, आशा संपते, दिवसांमागे दिवस जातात पण जे साध्य करायचं ते खरंच का मिळत नाही ? नेमकं काय चुकलयं हे पण कळत नाही. 

प्रयत्नांची शीग संपली की  नशिबावर विश्वास ठेऊन आपला रामगाडा आपण ढकलत राहतो आणि तरीही इतरांना विनासायास सगळ्या गोष्टी मिळतात हे पाहून मनात असूयादेखील येते आणि आपलं नशीबच वाईट म्हणून अजून निराशे चे बकाने भरतो . मानवी विचारशक्ती जिथे संपते तिथे मग आपण इतके उद्धट  होतो कि सगळ्याचा दोष देवावर ढकलून सगळ्या अपयशाचं खापर फोडायला देवाचं टाळकं वापरून मोकळे होतो. तो (देव) बिचारा निमूट आपल्या लेकरांचे बोलणे खात उभा असतो. 

हाच तर मानवाचा मूळ स्वभाव आहे. जे काही आपल्या सध्याच्या कामाचं नाही ते सगळं अडगळीत टाकतो आपण. त्यात सगळं येत, नदीत गटार सोडून, घर बांधायला जंगल तोडून, माय - बाप म्हातारे झाले कि घराबाहेर काढून, भूक लागली कि मुके प्राणी फाडून  मग कधीही न दिसलेला देव कसा सुटेल??

जरा कधी आपण दुःखात असलो कि एका आधाराची गरज असते पण सभोवतालच्या माणसांवर विश्वास ठेवण्या इतपत माणूस वेडा नाही म्हणून तो सरळ देवाला साकडं घालतो आणि रिझल्ट पण पटकन हवा असतो आपल्याला.  पण कित्येकदा न मागता तो काय देत हे आपण सोयीस्कररित्या विसरतो 

दुसरीही मुलगीच झाली म्हणून देवाला दोष देणार्यांनी जरा त्यांच्या डोळ्यात देव पाहावा ज्यांना अनेक वर्षांनी बाळ होते आणि नाही का ते नवे नवे आई बाबा पहिल्यांदा त्या बाळाला पाहून डोळ्यातल्या पाण्याचा नैवद्य मनोमन देवाला दाखवतात ?

रोज बेरोजगारीचे चटके झेलणाऱ्या तरुणाला जो एके दिवशी मुलाखत संपवताना म्हणतो कि "कधी रुजू होशील कामावर, हे घे तुझं ऑफर लेटर" तो देवापेक्षा कमी वाटतो का? आणि आपण रोजच्या कामाचा कंटाळा आला राव म्हणून देवालाच दोष देतो !!

सराफकडून दागिने विकत घेताना आपली किती फसवणूक होते ह्याची चीड येते पण हताशपणे मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या दागिन्यांची पिशवी रिक्षात विसरते आणि थोड्या वेळाने तोच रिक्षेवाला ती तशीच्या तशी वापस करतो तेंव्हा तो(देव) कोणत्याही रूपात येऊ शकतो ह्यावर विश्वास बसतो कि नाही?

कधी झोपलेल्या बाळाचा निरागस चेहरा बघून , कधी "तू काळजी करू नको, मी आहे ना " असं सांगणाऱ्या मित्राचा हात धरून, तुम्हाला कधीच "नाही" न म्हणलेल्या बाबाला बघुन आणि कधीच उपाशी न ठवणाऱ्या आईला बघून, दुरूनही तुमची काळजी करणाऱ्या बहिणीला किंवा पाठीत दणका देऊन शिकवणाऱ्या भावाला आठवून बघा देव आपल्याला आठवतो का? दिसतो का ? जाणवतो का ? 

आपण कसेही असलो तरी त्याच आपल्यावर प्रेमच असत फक्त आपलं हे चुकतं  कि आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे हि वृत्ती आपण सोडत नाही. 

काहीतरी मिळवणं म्हणजेच जगणं, केवळ जिंकणं म्हणजेच पुरुषार्थ ह्यावर आपला दृढ विश्वास बसायला लागलाय आणि कोणी कितीही आपल्या कानी कपाळी ओरडून सांगितलं कि " कर्म करा फळाची अपेक्षा करू नका" तरीही ह्याचा बोध आपण असाच घेतो कि कर्म केलं तर त्याच फळ आज ना उद्या आणि आपल्याला पाहिजे ते मिळणारच !! गीतेत सांगितलंय !!!

पण आपण फळा पेक्षा झाड लावण्याचा आनंद घेऊ शकलो तर जगणं सार्थक होईल आणि देवाला बोलणी खावी लागणार नाहीत. 😄

शेवटी, सुदामा त्याच्या बायकोने कृष्णाकडे धन मागण्याच्या गोष्टीला विसरला आणि केवळ प्रेमापोटी कृष्णाला भेटला आणि म्हणून देव देतो तेंव्हा आपली झोळी फाटल्या शिवाय राहत नाही, काय ??  


Sunday, 28 April 2013

Library Experience

Disclaimer: I have mentioned my experience and feeling about our life related to this experience. I have no motive to denominate systems in India and our habits. Please spare me if you think otherwise at some point while reading so. You can please share your  views/feedback at shreepaddeshpande@yahoo.com

Today, it was a really new day for me. Being Monday, a community library was open in my area till 6:30 PM and found it open after I left office at 5:30 PM. I have really never tried to be in a library(apart from college, that too to put impression of sincerarity on lecturers) not because I dont like to be in but, never thought what I would do once I get in? Again, in India, you are supposed to show that you are a good person and will take care of books if you think to be member of the library nearby you. You are asked to fill in a detailed form, your address proof, then address gets verified, then your application will be approved by master librarian and you get a membership card. Again, you can not roam around the library and choose your book, even if some of the libraries have that facility, its with locked cupboards so that you can just read their titles. Otherwise, you are supposed to be wise enough to pre-decide what book you want to read and tell it to librarian at the other side of small window in the library, he/she will look in to inventory and will give it to you as if you are borrowing big loan from him/her. You sign that book's card and agree to return that book before written date on it(Else fines are scheduled for you). In this entire process, I have experienced inconvenience to get right book for me and develop my area of interest about reading.

 I recalled, ever the librarian was willing to serve to readers, encourage them about reading, help them to choose good books, NO ! Not sure why but nearly all people in India do their work as duty and not as a job. They rarely exchange greetings, gestures, smiles while interacting with people and give you a rigid experience everytime. Whether its a library, reception in a hospital, school teachers, bus conductors, railway reservation counters, auto/taxi drivers, Poojari in temple, your boss in office, security guards in your building who so ever, do their work as duty. If they start feeling it as their job (the work with internal interest) and greet their service consumer while serving on job, our society will also blossom equally well, I am sure. 

Since childhood, we are taught to do things for some or the other benefit to "me" only. You are asked to sing songs (being a kid) by your parents when you are in front any relatives/friends. Not because you like that song, but, you are a demo, how well your parents brought you up compared to other parents. You are asked to score particular percentage in schools not you to gain that much knowledge but to be secure to obtain a position in higher studies and story goes on. In your employment, you are asked to do procedural task so you dont do mistake and remain productive for years so that company will benefit from you and your family, society will check your pockets to count your success in career. Well, there is being written so much about it by reputed writers and brought on screen by artistic film directors yet, I am writing again because we have habit to forget the message from book when we close it and whenwe reach to nearby hotel after a movie. And question remains, when things will change, when we will value our life, when we'll start our community giving back for things we get from it?

But, that day brought me some new experience. The main character of this blog, the Cadishead Library is located at 5 min walk from my home and just between way to office. I felt desire to visit this library some time and it was today. Very first thing I noticed that there were no "great" thoughts written anywhere in it and it was full of light and spacious in size. I felt something odd like facing a mysterious person at the first few feet in library. It was an entrance area, where many magazines, local event information on notice board and most important, there was no board warning "Keep Silence" (If you are from Pune you must have expected it). A stand to keep your luggage, umbrella, jackets etc. Beside it there was a bunch of plants with colorful flowers.  I walked in and stared at notice board. It was all talking about, how a few people helped some people in local community for their needs ( Not expecting government to help a needy always), their photographs, comments etc. Some notes were about how people have celebrated events in the area etc. In short, notice board was representing what people are doing there. So, it gave me a nice impression that, people do something though they dont appear on roads much. 

Next came the library reception. Two ladies were there, one was giving information to a library borrower some information in soft voice over phone. The other was sorting something down the desk. Both had computers on their desks, it was a open counter and not a window based partition. As I found both busy over reception, I didn't disturbed them to do their work as per standards here. But, the lady on phone somehow informed the other and she got up, smiled at me.

" You okay? I am sorry, didn't noticed you. You need any help?"
" Yes. I want to join library" I responded.
She recognized I am a new person.
"Oh sure! if could please feel this form and sign on it?"

It was expected to me but difference was it had only three fields, My name, date of birth and contact number. Rest was not required because, people here has trust that books will be surely returned back.
I filled up form in 30 secs and signed it. She prepared a library card alike a credit card with magnetic tape, wrote my name in it and handed over to me.

"Welcome, now you can use library. Please tell me if I have made mistake in your name" again with smile.

By being a computer programmer, I followed her and read my name carefully and verified its correct (Validation is crucial part of programmer's life). This was not expected to me. I was not prepared to choose a book, and was expecting only to fill a form today for its membership. But, bringing some borrowed smartness, I started searching for books. Without Google, life is becoming hard man ! 
I even find it very hard to find right dish to order from menu when I am in every new hotel in India. Same dish, different names(and prices too) in every other hotel. But, well it should be tasty enough on menu card......errred...I forgot it was a library we are talking about.

"May I know what type of books you line?" She came to book rack where I was standing.
Without wasting a moment I said, "ASP.NET 4.0 or WCF"

"I am sorry. What?" She questioned.
I realized myself and said in mind "Boss, its not your office library, come down"

"Ohh...I am sorry. Do you have books for computer science?"

"Yes. I will show you." We came to another rack. "Its here, you okay?"
"Thank you". I.

Damm it !! they were all MS-Office or 'How to use internet' or 'Know you computer' books. Again I realized, this library is not for virtual people like me. It was about gaining knowledge and learning. Not to keep you focused on what your company/society likes you to do. Now, I felt guilty of myself and decided that, I will not read a word about computers and will read about nature. I again started roaming around library. It was so colorful, spacious, ventilated and organized. I went in to another world and looked over few books. An elderly couple was reading and discussing something with a coffee mug in hand, I avoided to go near to them as it may disturb them(People here, respect everyone's privacy).

Coffee was served by librarian to both. An optional(!) payment of 20 Pennies was there, isn't that a rich life experience? A thought came to my mind.

A separate area for kids, disabled people. Even books were available for blind people. Free internet access was also available with headphones and web cameras too. Music/Video DVDs were also there.

It was for everybody, easily available for a cause that since childhood, every person should come in relation with books. Even in time when this(England) country is addicted to internet, they haven't orphaned books. This is an examples being conservative, you don't let good things go floating with time and people of Britain have proven it. 

I, many times have heard in India that, books are our best friend and experience is the best guide. We have these fiends there but do we have a system to make us reach to these friends?

Finally I choose a book on "Things to do in England" and came to counter.

"Just one?" She asked with a smile.
"Yes, its enough for me to start" I encountered a mechanical smile back.
"You may please choose more if you yet wish to choose"
"thanks! but, its really right for me"

The book was stamped with a return date, membership card was scanned, again she smiled and said "See you again"

I was walking towards home thinking, "Don't we deserve such a simple life in India?"

When I reached home Shaunak (my son) caught me in door and took me to his some playing toys to play with him and my first non-profit purpose library books is kept aside again. I am waiting to open it...


Shreepad Deshpande
29th April 2013